img
स्व. दिगंबरराव बागल
संस्थापक अध्यक्ष
श्री आदिनाथ बहुउद्देशीय संस्था संचलित
दिगंबररावजी बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज
ता. करमाळा, जि. सोलापूर, महाराष्ट्र
"ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचा प्रवास !"
📍 कुंभेज, ता. करमाळा, जि. सोलापूर — ४१३२०२  |  📞 +९१ ९८२२०४८३७४  |  📧 dbmvk@gmail.com
img
श्रीमती शामल ताई बागल
सचिव
img
सौ. रश्मी ताई बागल
संचालक
img
श्री. दिग्विजय बागल
कोषाध्यक्ष
नवीन सूचना
📌 शाळा सुरू होण्याबाबत सूचना 📌 महाराष्ट्र दिन कार्यक्रम नवीन प्रवेश सुरू करिअर मार्गदर्शन शिबिर शैक्षणिक सहल इयत्ता १०वी साठी अतिरिक्त वर्ग सुरू नवीन वेळापत्रक जाहीर 📌 शाळा सुरू होण्याबाबत सूचना 📌 महाराष्ट्र दिन कार्यक्रम नवीन प्रवेश सुरू करिअर मार्गदर्शन शिबिर शैक्षणिक सहल इयत्ता १०वी साठी अतिरिक्त वर्ग सुरू नवीन वेळापत्रक जाहीर

🏫 दिगंबररावजी बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज

श्री आदिनाथ बहुउद्देशीय संस्था, संचलित

शिकूया, घडूया आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करूया!

🏫 शाळेबद्दल – एक प्रेरणादायी प्रवास

माझ्या कुंभेज गावाच्या मातीतील एक अभिमानास्पद ठेवा म्हणजे दिगंबररावजी बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज. या विद्यालयाची पायाभरणी मा. स्वर्गीय दिगंबररावजी बागल (मामा) यांच्या दूरदृष्टीतून सन २००१ साली झाली. त्यांच्या शिक्षणावरील अपार प्रेमामुळेच या शाळेचा जन्म झाला.

या पवित्र कार्यात गावचे सुपुत्र मा. भारतभाऊ पाटील यांचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले. पण या शाळेचा प्रवास काही सोपा नव्हता… सुरुवातीचे दिवस म्हणजे संघर्षाची कहाणी होती.

शिक्षकांना बसायला ऑफिस नव्हते, वर्गांसाठी स्वतंत्र खोल्या नव्हत्या. एक वर्ग एका कोपऱ्यात, तर दुसरा दुसऱ्या कोपऱ्यात भरत होता. मुख्याध्यापकांचे कार्यालय कधी मंदिरात, तर कधी ग्रामपंचायतीच्या खोलीत चालत असे.

विद्यार्थ्यांचे वर्ग कधी प्राथमिक शाळेत, तर कधी गावच्या चावडीवर भरत होते. अशा परिस्थितीतही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हार मानली नाही.

बाबासाहेब घोरपडे यांनी दिलेल्या ३ एकर जागेमुळे शाळेला नवी दिशा मिळाली. त्यानंतर बांधकाम सुरू झाले आणि हळूहळू शाळेने प्रगतीचा मार्ग पकडला.

आज हीच शाळा विविध क्षेत्रात यश मिळवत आहे. येथे शिकलेले विद्यार्थी अधिकारी बनत आहेत आणि समाजात आपले स्थान निर्माण करत आहेत.

ही फक्त शाळा नाही… ही आहे संघर्ष, जिद्द आणि एकतेची जिवंत कहाणी!

आमच्या वैशिष्ट्ये

📚
गुणवत्तापूर्ण शिक्षण

अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन

🏫
आधुनिक सुविधा

डिजिटल वर्गखोल्या आणि ग्रंथालय

🎯
सर्वांगीण विकास

क्रीडा, सांस्कृतिक व विज्ञान उपक्रम